सामाजिक बांधिलकीतून केलेल्या पत्रकारिता व संघटन कौशल्यामूळेच नायगांव तालुक्याचा राज्यात गौरव - सूर्यकांत सोनखेडकर -NNL

राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाल्याने नायगांवमध्ये आनंदोत्सव


नायगाव बाजार।
गट-तट बाजूला सारून नायगांव तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून केलेली पत्रकारिता व संघटन कौशल्य यामुळेच नायगांवचा राज्यात गौरव होत असून तालुका मराठी पञकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार भुषणावह असल्याचे मत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद,मुंबई च्या वतिने स्व.वसंतराव काणे राज्यस्तरीय आदर्श तालुका मराठी पत्रकार संघ पुरस्कार लातूर विभागातून पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कासाठी कर्तव्यतत्पर असलेल्या नायगांव तालुका मराठी पत्रकार संघास नुकताच जाहीर करण्यात आल्यानंतर पाटबंधारे विश्रामगृह नायगांव बा.येथे आज आयोजित पत्रकारांच्या बैठकीत ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.

या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा. भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे,मनोहर तेलंग, सरचिटणीस दिलीप वाघमारे,जेष्ठ पत्रकार प्रा.निवृत्ती भागवत, पंडित वाघमारे आदी मान्यवरांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे लढवय्या नेतृत्व आदरणीय एस.एम. देशमुख,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी,राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील,राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक आभार, ऋणनिर्देश व पुरस्कार जाहीर झाल्याने अभिनंदनाचा ठराव नायगांव तालुका मराठी पत्रकार  संघाच्यावतिने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, पुरस्कार जाहीर झाल्याने नायगांवात फटाक्यांची आतिषबाजी करुन व एकमेकांना पेढे भरवून पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी पुढे बोलतांना सुर्यकांत सोनखेडकर म्हणाले की,आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्व समाजघटकांचे त्याचबरोबर,विकासात्मक प्रश्न मांडणारे पत्रकार बांधव सन्मानास पात्र असले तरिही कौटुंबिक जबाबदारी व आर्थिक ओढाताणीत मानसिक त्रस्त असतो. याचे प्रमाण नूकतेच जगभरात आलेल्या कोरोना महामारीच्या कालावधीत दिसून आले. त्यामुळेच 'आम्ही आमच्यासाठी' या स्तुत्य उपक्रमांतून आपण प्रत्येकांनी निधी संकलन केला व तो आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार व त्यांच्या कुटूंबियास देण्याचे सुतोवाच केले.

या स्तुत्य उपक्रमाची नोंद मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी घेऊन राज्यभरातील पत्रकारांनी असा आपत्कालीन निधी जमा करण्याचे आवाहन केले. हेच आपल्या सामाजिक कर्तृत्वाचे फलित आहे.नायगांव तालुका निर्मितीच्या आधीपासून नियोजित व त्यानंतर तालुका मराठी पत्रकार संघ म्हणून काम करतांना सर्व सभासद व पदाधिकारी आपल्या लेखणीतून सर्व समाजघटकांना प्रश्न सोडविण्यासह वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार तसेच,पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्काची जाणीव ठेवून प्रत्येक आंदोलनात व उपक्रमात यापूढेही अग्रेसर राहण्याचे आवाहन केले.

बैठकीचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी तर,उपस्थितांचे आभार आरोग्य व सामाजिक उपक्रम समिती प्रमुख शिवाजी पन्नासे यांनी मानले. यावेळी तालुका उपाध्यक्ष रामराव पाटील ढगे,मनोहर मोरे, रामप्रसाद चन्नावार,लक्ष्मण बरगे,नरसी शहर प्रमुख गोविंद टोकलवाड, कुंटूर सर्कलप्रमुख अनिल कांबळे,किरण वाघमारे, प्रशांत वाघमारे,शेषेराव कंधारे आदींसह नायगांव तालुका मराठी पञकार संघाचे पदाधिकारी व तालुक्यातील पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी