शासनाच्या आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्यावा- आ. हंबर्डे -NNL

श्याम नगर स्री रुग्णालयातील आरोग्य मेळाव्याला मोठा प्रतिसाद


नांदेड|
आजघडीला महाराष्ट्र  राज्यातील सर्व जिल्हा, पातळीवर आजादी का अम्रत महोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्याम नगर स्त्री रुग्णालय नांदेड येथे आरोग्य मेळावा प्रसंगी ते बोलत होते. 

मोफत आरोग्य मेळावा कार्यक्रमाला  अध्यक्ष म्हणून आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. शालीनी ईटनकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत संगेवार, डॉ. सुनील पल्लेवाड मंचावर उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक डॉ. पल्लेवाड यांनी केले. महापौर जयश्री पावडे यांनी आपल्या मनोगतात वैद्यकीय बांधवांनी केलेले कोरोना काळातील योगदानाबद्दल डॉक्टर, नर्स स्टाफचे अभिनंदनीय कार्य असल्याचे सांगितले. आ. कल्याणकर, आ. हंबर्डे यांनी आरोग्य मेळावा अनुशंगाने शुभेच्छा देत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. संचलन दिगंबर शिंदे तर आभार डॉ. प्रकाश गुरुतवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रदीप केंदे, डॉ. मधुकर हत्ते, डॉ. शुभांगी देशमुख,  बाळु पिंपळे, संजय आवाळे, सचिन गादेवाड, गणेश पाटील, डॉ. पद्मावती यडपालवार, डॉ. स्वामी सुवर्णा, डॉ. आयनिले, डॉ. आवटी,  डॉ. अंबुलगेकर यांनी परीश्रम घेतले. 

याचवेळी कार्यक्रमात आयुष्यमान भारत कार्ड चे वितरण केले. व मेळघाट भागात उत्कृष्ट कार्याबद्दल  डॉ. प्रकाश गुरुतवाड व डॉ. तानाजी लवटे यांचा विशेष सन्मान मान्यवरांनी केला. या मोफत आरोग्य मेळाव्याच लाभ हजारो लाभार्थी यांनी लाभ घेतला. तर अनेकांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कार्य निभावले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी