लोहा| नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी कराव्यात अशी मागणी शिक्षक काँग्रेसच्या वतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षक नेते प्रकाश मुंगल, मराठवाडा प्रदेशअध्यक्ष विठ्ठल चव्हाण निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारी माहे फेब्रुवारी व माहे मार्च 2022 ह्या दोन महिन्यापासून झाल्या नाहीत त्यामुळे शिक्षक बांधव हे मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. सर्व शिक्षक बांधवांचा दोन महिन्यांपासून थकलेला पगार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आर पि.एफएम. एस.योजनेला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यावर रक्कम वर्ग करण्यात यावी. विज्ञान विषय शिक्षकांच्या पदोन्नतीच्या सेवा जेष्ठता यादीतील त्रुटी देर करण्यात यावी आदी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश मुंगल सर,शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, जिल्हा सल्लागार बाबूराव कैलासे, जिल्हा सचिव माधव पंचलिंग, जिल्हा उपाध्यक्ष विलास जाधव, जिल्हा संघटक गोविंद नलावाड सर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.