स्वप्नपूर्ती टेंडरला आर्थिक लोभापायी मदत करणार्या राजकीय व प्रशासकीय अधिकारीवर गुन्हे दाखल करा -NNL

अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल - संतोष भाऊ देवकर  


नांदेड/हदगाव| हदगाव नगर परिषद अंतर्गत सन 2020-21 च्या दरम्यान घनकचरा टेंडरचे व्यवस्थापन स्वप्नपूर्ती ट्रेंडर या नागपूर स्थित संस्थेला देण्यात आले होते. सदर संस्थेने शासनाचे व कामगारांची दिशाभूल करत ईपीएफचे केवळ चलन जमा करून आजपर्यंत ईपीएफचे कोणतेही रक्कम शासनाला जमा न करता आपले टेंडर रक्कम उचलले आहे. त्याच बरोबर हदगाव येथिल स्थानिक राजकीय व्यक्ती च्या माध्यमातून सदरील संस्थेने आपली नगर परिषद मधिल अनामत रक्कम देखील उचलुन घेतले आहे. त्यासंदर्भात अनेक सामाजिक संघटनांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे तात्पुरती स्वरूपाचे संबंधित संस्थेवर हदगाव नगर परिषदने कारवाई केली असे दाखवून प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनतर संबंधित संस्थेसोबत हदगाव मधिल काही राजकीय व प्रशासकीय अधिकारी यांनी आर्थिक देवाणघेवाण करत पुन्हा नविन धनादेश काढुन आम्ही कुणाला भित नाही. कारण सत्ता आमची आहे ह्या आविर्भावात शासनाची व जनतेची दिशाभूल केली जात आहे. संबंधित संस्थेने केलेल्या अपहाराची चौकशी करून त्या संस्थेवर व त्यांना अपहारात मदत करणार्यां राजकीय व्यक्ती विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधित संस्थेला शासनाने काळ्या यादीत टाकुन या संस्थेच्या महाराष्ट्रातील कामे बंद करून त्यांची अनामत रक्कम जप्त करावी.


जेणेकरून इतर भ्रष्ट सरकारी कंत्राटी घेणार्या संस्थेवर वचक निर्माण होईल अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे मराठवाडा विभाग प्रमुख श्री संतोष भाऊ देवकर यांनी निवेदनाद्वारे उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना केले आहे. संबंधित संस्थेविरोधात शासनाने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा संतोष भाऊ देवकर यांनी दिला आहे.

संबंधित स्वप्नपूर्ती ट्रेंडर या संस्थेच्या नावाने हदगाव नगर परिषद ने काढलेले नविन धनादेश तातडीने स्थगित केले नसल्यास श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा गंभीर इशारा संतोष भाऊ देवकर यांनी दिला आहे. तसेच संबंधित संस्थेचे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारे अपहार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संबंधित संस्थेला नेमके कुणाचे राजकीय वरदहस्त लाभलेला आहे याची चौकशी होने गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे मराठवाडा विभाग प्रमुख संतोष भाऊ देवकर यांनी केले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी