मुखेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या संकल्पनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी पा मुकनर व विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिलचे औचित्य साधून वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा मुखेड शहरातील देबडवाड पेट्रोल पंप येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढत्या महागाईच्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देण्यात आले. 

यावेळी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील सावकार मुक्कावार, नांदेड रा.कॉ.सो.मी. जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, मुखेड रा.यु.कॉ.ता.उपाध्यक्ष निशिकांत पाटील,रा. युवक काँग्रेसचे सचिन(बबलू) देवकते,भटके सेलचे तालुकाध्यक्ष संजय गोरठे ,बाबा मणियार, वाजीत शेख, असिफ शेख, तोसिफ परदेशी, बबलू मणियार, आंनद पाटील जांभळीकर,सिद्धेश्वर शिंदे यांसह  राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी