वाजेगाव व वडगाव येथील रोहीत्र यंत्र जळाल्याने दहा गावातील विज पुरवठा खंडित -NNL

युवा सेनेच्या आंदोलन इशारा नंतर विजपुरवठा सुरळीत 


नविन नांदेड| वाजेगाव सर्कल मधील  वडगाव व सहा गावातील रोहित्र यंत्र गेल्या पंचवीस दिवसांपासून बंद असल्याने व मुसळधार पावसाने ग्रामस्थांसह शेतकरी विज पुरवठा अभावी त्रस्त असल्याने युवा सेना तालुका संघटक नामदेवराव पुयड, यांच्या नेतृत्वाखाली वाजेगाव येथील महावितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांना घेराव घातल्य नंतर लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी दोन दिवसांत विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत तात्काळ नवीन रोहित्र यंत्र बसविण्यात आले व विज पुरवठा सुरळीत झाला,तर वडगाव येथे नव्याने टाकलेला रोहीत यंत्र पुन्हा जळाला आहे.

वाजेगाव परिसरातील मोठा रोहीत्र व  वडगाव येथील हे दोन्ही ही जळाल्याने  पिंपळगाव, पुणेगाव, सिध्दनाथ, नागापूर, वांगी, ईजेगाव या गावातील विज पुरवठा गेल्या पंचवीस ते तिस दिवसांपासून खंडित असल्याने शेतकऱ्यांचे  शेती पंप व विज नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. तर महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. अखेर युवासेनेचे तालुका संघटक नामदेव पाटील पुयड यांच्या नेतृत्वाखाली सुनिल पुयड,बळीराम पुयड, विश्वनाथ पुयड, रामराव पावडे, गणेश घोरबांड, शंकर पुयड,एकनाथ पुयड, मुरली पुयड, पांडुरंग परशराम, एकनाथ देवराव, राजेश पुयड ,सुनिल पुयड यांच्या सह आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांनी  साहयक अंभियंता महावितरण वाजेगाव यांना घेराव घातला होता. अखेर तब्बल चार ते पाच दिवसांनंतर नवीन रोहीत्र टाकल्यानंतर तिस दिवसांपासून बंद असलेला विज पुरवठा सुरूळीत झाला होता. पंरतु वडगाव येथील रोहीत्र यंत्र 19जुलैला पुन्हा जळाल्याने गावात विजपुरवठा खंडित झाला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी