लकडोबा मंदिरासह हिमायतनगरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील - आ.माधवराव पा.जवळगावकर -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील प्रसिद्ध लाकडोबा मंदिर कमिटीचे परिश्रम व भाविक भक्तांच्या पुढाकारातून व्यापारी गाळे बांधून व्यापार क्षेत्राला चालना देण्याचे काम झालंय. गाळ्यासाठी अनेक जण इच्छुक आणि गाळे कमी होते. यातही मार्ग काढण्यासाठी एका चिमुकल्याच्या हस्ते ईश्वरी चिट्ठी म्हणजे ड्रॉ काढून गरजूना दुकानाच्या चाव्या दिल्या गेल्याचे कार्य अभिनंदनीय आहे. भविष्यात मंदिर कमेटीकडून आणखी गाळे निर्माण होतील. त्यामुळं ज्यांना गाळे (दुकाने) मिळाली नाहीत अश्यानी निराश होता काम नये. मंदिराच्या प्रत्येक कार्यात माझा सहभाग आहेच यापुढेही राहणार यात शंका नाही. मंदिरासह हिमायतनगर शहरातील विविध विकास कामाला चालना देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. असे अभिवाचन हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी लकडोबाच्या साक्षीने दिले.  


ते हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध लकडोबा चौक हनुमान मंदिर कमेटी आणि भाविक भक्तांच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांचा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. मराठी नववर्ष गुडीपाडव्याचा मुहूर्त साधून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी लक्की ड्रॉ विजेत्या व्यापाऱ्यांना गाळ्यांचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार महोदयांनी मारोतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर कमिटीच्या निमंत्रणास मान देऊन उपस्थित झाल्याबद्दल कमिटीच्या वतीने आ.जवळगावकर यांचा शाळा, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना जवळगावकर म्हणाले कि, लाकडोबा मंदिराच्या सभागृहाचे कामे, परमेश्वर मंदिर आणि कालिंका मंदिराच्या विकासासाठी माझ्याने होईल तेवढे मी केले आहे. आणखीसुद्धा बरेचशे करायचे आहे.


येथील लकडोबा चौकातील राहिलेला अर्धवट रस्ता आमदार होताच पहिल्यांदा निधी देऊन पूर्ण केला.  त्यामुळे न्यालयासमोरून जाताना होणार्रे अपघात कमी करण्यासाठी यश मिळाले आहे. याचं बरोबर येथे पाण्य्साठी बाराही घ्या आला आहे. लकडोबा मंदिर चौक परिसरातील झगमगाट व्हावा यासाठी येथे उंच हायमेक्स बसविण्यात येईल. त्यामुळे हा परिसरात रात्रीला देखील दिवसच प्रत्यय येईल. शहरातील मुख्य नाल्या आणि रस्त्यासह विविध विकास कामे सुरु आहेत. यासह शहरातील सर्वच प्रभागातील पुढे येणाऱ्या समस्यां सोडविण्यासाठी सैदव प्रयत्नशील राहिले असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 


या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, धानोरा सोसायटीचे चेयरमन गणेशराव शिंदे, सोसायटीचे संचालक सुभाष शिंदे, शहराध्यक्ष संजय माने, गंगाधर मामीडवार, तुकाराम मेरगेवाड,  अनंता देवकते, श्यामराव माने, बाबुराव माने, विठ्ठलराव माने, बाबुराव पालवे, विठ्ठल बनसोडे, नारायण तोटेवाड, भगवान पाटील, योगेश चिलकावार, शेंनेवाड, श्याम जक्कलवाड, फेरोज कुरेशी, मन्नान भाई, शेख इस्माईल गादीवाले, आदींसह या भागातील महिला - पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी