धनेगाव येथील भागवत कथेची हभप आळंदीकर यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता समारोप -NNL


नांदेड|
धनेगाव ता. नांदेड येथे दि. १६ एप्रिल रोजी पासून हनुमान मंदिर परिसरात श्रीमद् भागवत कथा, ज्ञानयज्ञ, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. २३ एप्रिल दरम्यान  आले होते. २३ रोजी काल्याचे किर्तनाने धार्मिक सांगता करण्यात आली. धनेगाव समस्त गावकरी मंडळी यांनी मोठ्या संख्येने परीश्रम घेतले. 

दि. १६ एप्रिल रोजी हभप पवन महाराज अहमदपूर, १७ रोजी हभप परमेश्वर महाराज कंधारकर, १८ ला हभप सोपान महाराज सानप शास्त्री आळंदी, १९ रोजी हभप  अशोक महाराज इदगे, २० रोजी हभप कांचनताई शेळके, २१ रोजी हभप मुक्ताई माऊली खर्डा, २२ व २३ एप्रिल रोजी हभप मनोहर महाराज आळंदीकर यांचे किर्तन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. नित्याने काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पुजन, श्रीमद् भागवत कथा हरिपाठ व रात्री ८ ते १० वा वेळात महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार यांचे किर्तन पार पडले. दुपारी १२ ते ४ या वेळात भागवताचार्य श्री. संतोषानंद शास्त्री यांच्या गीतमय भागवत कथेने भावीक मंत्रमुग्ध झाले. धनेगाव आणि परीसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली होती. 

दि. १८ एप्रिल रोजी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी धनेगाव भागवत कथेला उपस्थित राहून भेट दिली. यावेळी दर्शन घेवून आ. हंबर्डे यांनी सभागृह उभारणीसाठी १  कोटी ४३ लक्ष रुपयांची निधी जाहीर केला. यावेळी जि प सदस्य मनोहर शिंदे, सरपंच पिंटू पाटील शिंदे समवेत नागरिक उपस्थित होते. दि. २२ एप्रिल रोजी संतोष शास्त्री व रावसाहेब महाराज यांची रथातून धनेगाव मुख्य रस्त्याने शोभायात्रा काढली. यातच मिरवणुकीत श्रीमद् भागवत कथा, श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांची सुध्दा मिरवणूक सोहळा उत्साहात साजरा झाला. दि. काल्याचे किर्तनाने व महाप्रसादाने भागवत कथेची सांगता झाली. या सप्ताहाला यशस्वी करण्यासाठी धनेगाव ग्रामस्थांनी विशेष परीश्रम घेतले. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी