आ.रवि राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, शिवसेना पदाधिकारी यांच्यी मागणी -NNL


नविन नांदेड।
आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचे विरोधात भा.दं. वि. १५३(a), ५०५ (१) (b), ५०५(२), ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
   
 दिलेल्या निवेदनात २४ एप्रिल रोजी मोबाईल बघत असतांना दि.२३ एप्रिल रोजीची मुंबई येथील रवी राणा व नवनीत राणा यांच्या बाबतच्या बातम्या व व्हिडीओ बघत होतो. यामधे माझ्या असे निदर्शनास आले व माझी खात्री झाली की आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या हनुमानाचा महिमा सांगणारा हनुमान चालिसा हे स्तोत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन भोंगा लावुन वाचणार असल्याची घोषणा केली. सदर हनुमान चालिसा पठनासाठी राणा दांपत्य ५०० समर्थक लोकांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानी जाणार असल्याचे आव्हान देत होते आणि महाराष्ट्रातील मराठी जनता व इतरांमधे शत्रुत्व, वैरभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात अराजक माजवत असल्याचे मझ्या निदर्शास आले. 

दि. २३ एप्रिल च्या दिवसभराच्या घटनांनंतर सायंकळी मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केल्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानातुन बाहेर पडतांना उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना दंगल घडवण्याच्या उद्देशाने भडकवण्यासाठी आक्षेपार्ह हातवारे केलेत. सदर प्रकारानंतर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना खार पोलिस ठाणे येथे नेले असता पोलिसांच्या गाडीतुन उतरल्यानंतर या दोघांनी खार पोलिस ठाण्या बाहेर असलेल्या लोकांना उद्देशुन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी समान उद्देशाने महाराष्ट्रातील दोन समुदायांच्या मधे धर्म आणि भाषेच्या आधारावर शत्रुत्व, वैर निर्माण होण्याच्या उद्देशाने खाजगी निवासस्थानी रस्त्यावर हिंदूंच्या पवित्र स्तोत्राचे पठन करण्याची धमकी देत तसेच दोन गटांमधे शत्रुत्व व वैरभाव निर्माण होण्याच्या उद्देशाने हातवारे करुन महाराष्ट्रातील शांतता व सुव्यवस्था खराब करण्याच्या उद्देशाने तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुंबई तसेच महाराष्ट्राची शांतता व धोक्यात आणली आहे. 

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे विरोधात माझी ही तक्रार असुन विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे सौ. निकीता व्यंकटेश शहापूरवाड जितुसिघ उपशहर प्रमुख सिडको, उमेश मुंडे शिवसेना जिल्हा प्रमुख,अशोक पाटील उमरेकर महानगर प्रमुख नांदेड, तुलजेश तूलजश यादव , नांदेड शहर प्रमुख, दिपक देशपांडे उपशहर प्रमुख सिडको, प्रमोद मैड, सतिश खैरे, राजुभाऊ कुलथे, जेष्ठ शिवसैनिक, श्रीमती दिपाली उदावत, तालुका समन्वय, शैलेशसिंह रावत उपशहर प्रमुख गाडीपूरा, अॅड. जयश्री कंधारे, कृष्णा पांचाळ, यांच्यासह शिवसैनीक  ऊपसिथीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी