शाळा पूर्वतयारी पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची बैल गाडीतून मिरवणूक .
अर्धापुर| तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा पूर्वतयारी उपक्रम राबविण्यात आले असून पहिली वर्गातील विद्यार्थ्यांची बैल गाडीतून मिरवणूक काढण्यात आली आहे.
अर्धापुर तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात शाळा पूर्वतयारी उपक्रमात पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची बैल गाडीतून गावात मिरवणूक काढली यामध्ये बैलांना झुली,माळा ,फुगे , घुंगरू घालून बैलांना सजवून बँड , डफली वाजवत गाडीतून मुलांची मिरवणूक काढण्यात आली .तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांनी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी आणि त्यांच्या आई वडीलांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून शाळेच्या दारावरही मुलाचे स्वागत करण्यात आले. गावात शैक्षणिक फेरी काढून गावात एक प्रकारे शिक्षणाचे चैतन्य निर्माण केले आहे.
अर्धापुर तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून राज्यस्तरावर नाव लौकिक मिळविले आहे .या शाळेचे मुख्याध्यापक संतोष राऊत यांनी शाळा पूर्वतयारी या उपक्रमात नवीन प्रयोग केला असून या उपक्रमामुळे शाळा पुन्हा चर्चेत आली आहे .या उपक्रमासाठी शामराव देबगुंडे, लक्ष्मणराव देबगुंडे, ज्ञानेश्वर देबगुंडे, आबासाहेब देबगुंडे, दादाराव पाटील,सुनिल देबगुंडे, द्या देबगूंडे,बालासाहेब वाघमोडे, निर्गुण देबगुंडे,यादवराव कदम, बजरंग देबगुंडे, पप्पू देबगुंडे यांनी मोलाचे सहकार्य मिळते असे मुख्याध्यापक संतोष राऊत यांनी सांगितले आहे.