नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस ला एक डब्बा कायमचा वाढवला -NNL


नांदेड|
गाडी संख्या 12751/ 12752 हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी- हुजूर साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत श्रेणी चा डब्बा कायमचा वाढविण्यात आला आहे.

दिनांक 8 एप्रिल, 2022 पासून नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि दिनांक 10 एप्रिल, 2022 पासून जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये हा डब्बा वाढविण्यात येईल. हा डब्बा वाढविल्या नंतर या गाडीमध्ये एकूण 19 डब्बे असतील. यात 2 लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, 10  तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि 06 द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे डब्बे लावले जाणार आहेत. 

दिनांक 5 एप्रिल ला सुटणाऱ्या सचखंड एक्स्प्रेस च्या मार्गात उत्तर रेल्वे मध्ये बदल                     

उत्तर रेल्वे ने कळविल्यानुसार उत्तर रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे सचखंड एक्प्रेस च्या मार्गात एक दिवस बदल करण्यात आला आहे.

हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 5  एप्रिल, 2022  रोजी सुटणाऱ्या गाडी संख्या 12715 नांदेड –अमृतसर सचखंड एक्प्रेस च्या मार्गात उत्तर रेल्वे मध्ये बदल करण्यात आला आहे. दिनांक 5 एप्रिल, 2022 ला सुटणारी हि गाडी तिचा नियमित मार्ग बदलून सोनीपत-गोहाना-पानीपत या मार्गाने धावेल. प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी