किनवट| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी ता.किनवट यांची जिल्हास्तरिय सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी ता.किनवट जि.नांदेड यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सनिमित्ताने शिक्षक भारती नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरिय सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
कनकवाडी शाळेचे मुख्याध्यापक, सर्वशिक्षक बंधु मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रा.प. सर्व सदस्य गावातील सर्व मंडळी सर्वांचे मनपुर्वक खुपखुप अभिनंदन मा.दीपक राणे (मुख्यध्यापक ) मा.पंडीत व्यवहारे (शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ) जयपाल कांबळे (मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक )