लोहा| कोरोना काळात शिक्षक सुनील वसंतराव महाजन या शिक्षकांचे निधन झाले.३१ मार्च रोजी शिक्षक नेते पी डी पोले यांच्या पुढाराने लोहा व कंधार तालुक्यातील शिक्षक मित्र परिवार एकत्रित येत त्यांनी प्रथम पुण्यतिथी निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्या निमित्ताने सुनील महाजन यांनी कन्या अंजली हिने.
कशे आहात पप्पा, अचानक कुठं गेलात... गेलात तर गेलात मग परत का नाही आलात ? अशी भावनिक व आपोआप डोळे पाणावणारी कवितेचे बॅनर शहराच्या मुख्य चौकात झळकले..पितृछत्र हरवलेल्या कुटुंबियांच्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. कोरोना काळात मागील वर्षी अनेकांचे निधन झाले. शिक्षकांची संख्या तशी अधिकची .जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील वसंतराव महाजन , (लोहा) यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबिय व मित्रपरिवार याना मोठा धक्का बसला.३१ मार्च महाजन गुरुजींची प्रथम पुण्यतिथी त्यानिमित्ताने पी डी पोले व मित्रांच्या वतीने भावपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथे पार पडला.
पप्पा ,मी वाट बघतेय अचानक कुठे गेलात उशीर होणार तर करायचा होता एक फोन.. तुम्ही आहे असं सांगुन एक शरीर आणलं होतं माहीत नाही होत ते कोण ?ते शरीर तुमच्या सारख दिसत होतं पण नव्हतात ते तुम्ही.तुम्ही असतात तर त्याला आग लावली असती का आम्ही ?ते बोलत नव्हतं, चालत नव्हतं, हसतही नव्हतं..मित्रांना, परिवाराला बघुन ते त्यांच्या जवळ बसतही नव्हतं... एक- दोन दिवस नाही तर झाले महिने अनेक.. मोबाईल नसेल जवळ तर पत्र तरी पाठवा एक..पत्ता तरी सांगा मी येईल तेथे भेटायला..
कोणाला तुमची काळजी नाही उगाच असं नको वाटायला.. तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करतेय येऊन ते बघा तरी, माझं काय चुकतय पप्पा एकदा येऊन सांगा तरी...हक्क नाही तुम्हाला कुठे जाण्याचा मी सोबत नसताना, डोळे तरसलेत पप्पा, बघायचंय तुम्हाला तुमच्या खुर्चीवर बसताना...माझ्या अश्रुंचा एक थेंब न बघु शकनारे तुम्ही आज एवढं का रडवलतं ? शेवटी असच सोडुन जायच होत तर एवढया प्रेमानं राणीसारखं का वाढवलत ? राणीसारखं का वाढवलत? अशी पोस्ट लेक डॉ. कु. अंजली सुनिल महाजन हिने केली आणि हे बॅनर वाचून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू गळाले.
लोहा कंधार तालुक्यातील शिक्षक मित्रांच्या वतीने कै.सुनिल वसंतराव महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस.एन.डांगे होते यावेळी ज्येष्ठ शि.वि.अ. सर्जेराव टेकाळे लक्ष्मीकांत बिडवई, श्रीमती आंबलवाड मॅडम,केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे,.मु.अ. बी.वाय.चव्हाण जे.एस. वाघमारे, विठुभाऊ चव्हाण मिलिंद खरोटे, दिपक रुद्रावार,सौ.स्वामी मॅडम आणि लोहा कंधार तालुक्यातील शिक्षक मित्रमंडळी उपस्थित होते. जी.वाय.वाघमारे यांनी संचलन तर फारुक शेख यांनी आभार मानले. आठवणीने उपस्थित गहिवरले मित्रा प्रति संवेदना कायम राहिल्या .