हदगाव, शे चांदपाशा। तालुक्यातील ब्राम्हण समाजाकडुन येथील तहसिलदार तथा दडाधिकारी यांना निवेदन देवुन आ.आमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आला आहे.
आ. मिटकरी यांनी सांगलीतील जाहीर सभेत हिंदु देवतांचा व श्रद्धेचा जाणीवपूर्वक अपमान केला कन्यदान या संस्कार पद्धतीवर गलिच्छ द्वेषमुलक खोटी बेताल टीका करुन समाजात तेढ निर्माण करणारे व ब्राम्हण समाजा बद्दल लोकामध्ये अतिशय चुकीचा संदेश देणारे आणि सामाजिक सलोखा नष्ट करणारे वक्तव्य केल्याचा कृतिचा निषेध केला.
त्यामुळे कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनद्वरे केली आहे या निवेदननावर ब्राम्हण सामाजाचे तालुका अध्यक्ष राजु पांडे महीला उपाध्यक्ष आश्विनी शाहणे सौ मोनिका पांडे आशोक शाहणे उमाकांत भोरे मेघा वाटेगावकर दिपक जोशी सुनिल वाटेगावकर कैलाश जोशी व ब्राम्हण समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.