पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी रक्तदान ,१८ तास अभ्यास तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले ,परंतु काही तरुणांनी सामान्य नागरिक ,ज्येष्ठ नागरिक ,लहान मुले व जयंती मधील कोणत्याही वैचारिक मूल्याचा विचार न करता आपल्या ताब्यातील दुचाकी वाहनां मध्ये सायलेन्सर काढून बदल करून कर्ण कर्कश आवाज करत सार्वजनिक ठिकाणी बेदरकार वाहने फिरवून शांतता भंग करून मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन केले.
तयांच्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली विवीध ठिकाणी तपासणी करून 09 वाहने ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड कडे अहवाल सादर केल्याने सबंधित विभागाने वाहन तपासणी करून वाहनात विना परवाना केलेल्या बदलामुळे जवळपास ४२ हजारांचा दंड आकारणी केली आहे,जेणे करून भविष्यात असे प्रकार करून कुणीही अश्या प्रकारचें गैरवर्तन करणार नाहीत. या कार्यवाही मुळे दुचाकी वाहनधारकात खळबळ उडाली आहे.