शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा. याप्रमाणे गावकऱ्यांनी शाळेसाठी भरीव योगदान देत असल्याचे दिलासादायक चित्र गावागावांत दिसून येत आहे. पोखरभोसी ( ता. लोहा) येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी गावकऱ्यांनी सजविलेल्या बैलगाडीतून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना बसवून मिरवणूक काढून शाळेत आणले. शुक्रवारी दि. २२ रोजी झालेल्या या जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमात गावातील प्रमुख गावातील मंडळी, पालक अंगणवाडी सेविका,मदतनिस, शाळा समिती व्यवस्थापन सह उत्साहाने सहभागी झाले असल्याचे दिसून आले.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के जिल्हा परिषद नांदेड चे कार्यक्रमाधिकारी विलास ढवळे, विषयतज्ज्ञ श्री. संजय अकोले, यांनी यावेळी उपक्रमात सहभागी होवून मार्गदर्शन केले.साखर कारखाना गांधीनगर संकूलाचे केंद्रप्रमुख अशोक आढाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पाटील,सरपंच प्रतिनिधी कैलास गिरी महाराज,उपसरपंच फुलाजी पाटील ताटे, विक्रम पाटील डांगे,भगवान ताटे, गजानन डांगे, छावा तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील ताटे, सौ.महानंदा सूर्यवंशी, गोविंद भावे, माणिक ताटे, विजय ताटे, सौ.निलूताईताटे, सौ.शकुंतला ताटे,सौ.सखुबाई ताटे,मदतनीस सौ. मथूराबाई कांबळे,मुख्याध्यापक हारी मुळे, ज्योती शिंदे, नरसिंग रेगुलवाड, कोंडीबा कुंभारगावे, सायलू कानगुलवार, अमिन शेख, गोविंद चव्हाण या सर्व शिक्षकांनी व गावातील गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेऊन मेळावा यशस्वी केला.