नांदेड। देशपातळीवर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त या विषयावर नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांचे नांदेड आकाशवाणी वरून उद्या रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी भाषण प्रसारित होणार आहे.
केंद्र शासनाच्या 9 कलमी कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याचे नियोजन, ग्रामसभेचे आयोजन, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गावांचा शाश्वत विकास संकल्पना आदी विषयावर त्यांनी माहिती दिली आहे.