नांदेड। शहारातील लालवाडी चौकात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . रमझान महिन्यात अनेक ठिकाणी इफ्तार पार्ट्या असतात . पण लालवाडी इथली ही इफ्तार पार्टी थोडी वेगळी होती . कारण या इफ्तार पार्टीतुन सामाजिक एकात्मतेचा संदेश होता.
या इफ्तार पार्टीत परिसरातील सर्व धर्मीयाचे नागरीक उपस्थित होते. सध्या सर्वकडे धार्मिक तेढ निर्माण होत असतांना या लालवाडी भागातील सर्वधर्मीयांनी हा आदर्श समाजा समोर ठेवला . रमझान हा सण इस्लाम धर्मीयांचा जरी असला तरी इथं सर्व समाजाचे लोक एकोप्याने सण साजरे करतात . पोलीस विभागात कार्यरत असलेले पांडूरंग माने नेहमी यासाथी पुढाकार घेतात .
आताही पांडूरंग माने यांनी सर्वधर्मीयांची इफ्तार पार्टी ही आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता . त्यानुसार शेख फारुख, शेख शाझील लाला मित्र मंडळाने परिश्रम घेऊन इफ्तार पार्टीचे उत्तम नियोजन केले .लालवाडी ,महर्षी दधीची सोसायटी , नारायण नगर ,अरविंद नगर येथील सर्व धार्मियाचे नागरिक या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते .