जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले
हिमायतनगर, अनिल मादसवार| भारतीय जनता पार्टी पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हिमायतनगर (वाढोणा) शहराला शुक्रवार दि.२९ एप्रिल रोजी भेट दिली. प्रथम त्यांनी येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने त्यांचा संचालक अनिल मादसवार यांनी शाल, पुष्पहार, श्रीची प्रतिमा व शिवपर्व २०२२ चा विशेषांक देऊन स्वागत सत्कार केला.
त्यानंतर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हिमायतनगर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या निवासस्थानी भेट दिली. भाजपच्या वतीने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रल्हाद उमाटे, माधवराव उचेकर, गुरुप्रितसिंघ सोखि आणि त्यांच्या सोबत आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार फटाक्याच्या अतिशबाजीत केला. यावेळी उपस्थित झालेल्या शहरातील, नागरिक, व्यापाऱ्यांशी खा.प्रतापराव चिखलीकर यांनी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतल्या. यात हिमायतनगर शहरातून विदर्भाकडे जाण्यासाठी बायपास रस्ता व्हावा अशी मागणी रमेश कोमावार यांनी केली. हिमायतनगर स्थानकांवर धनबाद एक्प्रेसला थांबा द्यावा, गाडी क्रमांक १७६१३ पनवेल - नांदेड हि गाडी किनवट पर्यंत विस्तारित करून सोडण्यात यावी, रेल्वेच्या संदर्भातील अन्य समस्या गौतमचंद पिंचा आणि मुलचंद पिंचा यांनी मांडून तसे निवेदन दिले.
गेल्या ४ वर्षांपासून हिमायतनगर शहरातून होत असलेल्या किनवट- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, ठेकेदाराने डांबरीकरण न खोडात रास्ता करण्याचा सपाट लावला. तसेच यातील काही पूल गायब करून थेटर माथूर पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाचे काम करून प्लस काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एव्हडेच नाहीतर शहरातून डिव्हायडर सुद्धा न करता अपघाताला एक प्रकारे चालना देण्याचे काम केले जात आहे. या रस्त्यासाठी मतदार संघाच्या आमदारांनी आंदोलन करुणही कुंभकर्णी झोपेतील ठेकेदार जागा झाला नाही. त्यानंतर विविध पक्ष संघटनांची निवेदने दिले, वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या मात्र अजूनही रस्त्याच्या दरजा सुधारण्यासाठी काहीच फायदा झाला नाही. याकडे आपल्या माध्यमातून लक्ष देऊन ना.नितीन गडकरी साहेबांच्या निदर्शनास हि बाब आणून द्यावी असा प्रश्न किशोर रायेवार, आणि त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित करून लक्ष वेधले.
यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्वच प्रश्नावर सखोल चर्चा झाली. या बाबतीत माहिती घेऊन सबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचे आश्वासन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.