शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्य महोत्सवाचा शानदार समारोप
इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा १२० वा विनामूल्य कार्यक्रम होता. ज्येष्ठ नृत्य गुरु सुचेता भिडे-चापेकर,शमा भाटे, स्वाती दैठणकर, नीलिमा आद्ये,भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दीपप्रज्वलन करून प्रारंभ केला.
संस्थेच्या वतीने रसिका गुमास्ते,अरूंधती पटवर्धन यांनी स्वागत केले.२३ एप्रिल पासून आठवडाभर या नृत्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले.कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या खंडानंतर हा नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
अरूंधती पटवर्धन , मनिषा साठे यांच्या मनिषा नृत्यालय संस्थेच्या शिष्या,शमा भाटे यांच्या नादरूप संस्थेच्या शिष्या,प्रमद्वरा कित्तूर, मंजिरी करुलकर, सुचित्रा दाते, शिल्पा दातार, नीलिमा आद्ये यांच्या नृत्य भारतीच्या शिष्या, लीना केतकर, केतकी शाह, गायत्री आंबेकर, तेजस्विनी साठे, स्नेहल कळमकर, आदिती कुलकर्णी, रसिका गुमास्ते, नेहा मुथियान, पूर्वा शाह, पूनम गोखले, आस्था कार्लेकर, विदुला कुडेकर, प्राजक्ता अत्रे, शशीकला रवी, सुवर्णा बाग, नीलिमा हिरवे, अर्चना पटवर्धन, अपर्णा धूपकर, केतकी शेणोलीकर, मानसी वझे, अमृता परांजपे यांनी बहारदार नृत्य सादरीकरणे केली. अरुंधती पटवर्धन यांनी महोत्सवाची माहिती दिली. स्वरदा अनगळ, मानसी जोग यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र दुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.