महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.दुलेवाड यांचे आवाहन
उस्मान नगर व परिसरात दुष्काळी स्थिती परिस्थिती असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी थंड,गार पिवावे वाटते.थंड,गार पाणी नागरिकांना , विशेष करून मजूरदारांना पाणी ठिक ठिकाणच्या बोअर, अथवा विहीरीचे पाणी पिण्यास मिळते .दिवसभर उन्हात कष्ट ,काम केल्यावर सायंकाळी थकवा जाणवत आसतो.काहीना विविध प्रकारच्या ठिकाणांचे जलजन्य रोग साथीचे जसे कावीळ, गॅस्ट्रो , अतिसार, विषमज्वर, हिवताप आदी रोग होण्याची शक्यता होत असते.
सदरील रोग टाळण्यासाठी जनतेने आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे त्यासाठी उन्हात जास्त वेळ सतत उभे राहू नये ,गेम दहाच्या नंतर व चार वाजेपर्यंत उन्हात जड काम करू नये, शेतातील कामे सकाळी किंवा सायंकाळीच्या वेळी करून घ्यावे.उन्हापासून संरक्षणासाठी पांढरेशुभ्र सुट्टीचे कापड वापरावे, डोक्याला रुमाल बांधावे ,स्वच्छ व निर्मळ असलेले पाणी भरपूर प्यावे ,उन्हातून आल्या बरोबर पाणी पिऊ नये, थोड्यावेळाने प्यावे.
नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा घाण साचलेले पाणी वाहते करून द्यावी, प्रचंड उकाडा होत असल्याने पाणी साखर मीठ लिंबू मिसळून द्यावे, जेणेकरून थंडवा मिळेल. जर नागरिकास हात ,पाय ,डोके, हिवताप ,आजार वाटत असल्यास नजिकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावा असे शेवटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद नंदगावे व महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण दुलेवाड यांनी सांगितले.