अर्धापूर, निळकंठ मदने| मर्यादा पुरुषोत्तम रामाचे चरित्र हे भारतीय संस्कृतीचा प्राण आहे.त्यांचा आदर्श घेऊन आचरण करावे.परमार्थ हा आवडीने करावा तर संसार सवडीने करावा असे प्रतिपादन हभप पांडुरंग महाराज इटलापूरकर यांनी सोमवारी (ता ११) यांनी केले.
शहरातील श्रीरामनगरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवतार कार्याविषयी निरुपण करतांना पांडुरंग महाराज इटलापूरकर म्हणाले की,या दोन्ही अवतारी पुरुषांनी दुष्टांचे निर्दालन करुन साधुंचे, सत्पुरुषांचे संरक्षण केले आहे.साधू संतांनी सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करून आपल्या नरदेहाचा उद्धार करावा असे आवाहन हभप पांडुरंग महाराज इटलापूरकर यांनी केले.
श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा रामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांना रामभक्तांनी खूप मोठा प्रतिसाद दिला.या सोहळा यशस्वी करण्यासाठी गूणवंत विरकर गजानन मेटकर, शरद देशमुख,श्याम देशमुख, नारायण डक, शिवाजी भुसारे, दिपक गव्हाणे, निलेश हिंगमिरे, नितीन गुंजकर, शूभम सिनगारे कोंडीबा मेटकर, बालवीर देशमुख, गोविंद गायकवाड, गणेश पवार,गणपत राऊत, शुभम पत्रे,श्रावण वीरकर, ओमकार डक, पांडुरंग विरकर , आदिनी पुढाकार घेतला.यावेळी शंकरराव कुलकर्णी, जीवन नायगावकर, दिगंबर डक, आर आर देशमुख, सोनाजी साखरे, एकनाथ पाच्छे, देवीदासराव देशमुख, मधूकर देशमुख, पद्माकर देशमुख, दिलीप मोटरवार, बालाजी मोटयवार, पिराजी साखरे, माधव साखरे, विश्वनाथ सिनगारे, बालाजी बोराटे, गोपीनाथ वीरकर, राजू लोकमनवार आदी उपस्थित होते.आभार प्रमोद मुळे यांनी मानले.