डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक उपक्रम -NNL


नांदेड|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत मार्जिन मनी योजनेची कार्यशाळा सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात नुकतीच सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. तेजस माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. 

यावेळी आयडीबीआय बॅक शाखा व्यवस्थापक अमित कुमार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम, पंडित खानसोळे, कैलास मोरे, रंगराव सुर्यवंशी, श्रीमती माधवी राठोड आदीसह नव उद्योग करण्यासाठी इच्छुक असलेले अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व कर्मचारी उपस्थित होते. 

तालुका समन्वयक श्रीमती अंजली नरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात केली. बापू दासरी यांनी या योजनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक अमित कुमार यांनी नवीन उद्योग सुरु करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना या योजने अंतर्गत कर्ज पुरवठा करण्यास त्यांची बॅक तयार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार, तालुका समन्वयक तर आभार प्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक दत्ताहारी कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी