नांदेड। सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खामराव वानखेडे यांना नांदेड पोलिस दलातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पोलीस पदक वितरण समारंभ दि. २१ मार्च २०२२ रोजी राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला.त्याबद्दल नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी खामराव वानखेडे याचा यथोचित सत्कार केला.
नांदेड जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे हे सध्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी पोलिस दलात लिंबगाव, उमरी, मुदखेड, बारड, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, शिखसेल नांदेड, महिला सुरक्षा पथक नांदेड, महामार्ग पोलिस नांदेड, विशेष सुरक्षा विभाग नांदेड येथे उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी केली. तसेच त्यांनी दरोडे, घरफोडी, चोर्या आदी गुन्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यामुळे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना अनेक बक्षीस व प्रशस्तीपत्रक मिळाले आहेत.
पोलिस सेवेत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकार नवी दिल्ली यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर केले होते. त्याचा वितरण समारंभ दि. २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता दरबार हॉल राजभवन मुंबई येथे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सपंन्न झाला.त्याबद्दल सपोउपनि. खामराव वानखेडे यांचे पोलिस दलासह विविध राजकीय.सामाजिक मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी खामराव वानखेडे यांच्या कार्याचे कौतुक करुन यथोचित सन्मान साई सुभाष अंनदनगर नांदेड येथे केला यावेळी मा.जि,प,सदस्य प्रतिनिधी साहेबराव गायकवाड.वाहातुक शाखेचे सा,पो.नि.माधव झडते, पो.जमादार नागोराव कानगुले.पत्रकार सुनिल रामदासी, स्वियसाह्याक मारोती जाधव.योगेश सुतारे आदीची उपस्थिती होती.