केंद्रिय कृषीमंत्र्यांचा दावा हास्यास्पद
अर्धापूर, निळकंठ मदने| शेतक-यांचे उत्पन्न दहा पटीने वाढल्याचे हास्यास्पद दावा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला . प्रत्यक्ष उत्पन्नात दुप्पट वाढ झाली असली तर आज सुंदर आणि शिकलेल्या पोरीही लग्नासाठी शेतकऱ्यांच्या मागे लागल्या असत्या. शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेतकऱ्यांना मुली देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असे बेजबाबदार व हास्यास्पद वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली .
२०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केला. अद्याप तरी कोणत्याही राज्यात उत्पन्न दुप्पट करता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेती करणे हे परवडणारे नाही शेतीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होणार नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती सोडून अन्य पर्याय शोधत आहेत .
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना शेतकर्यांच्या मुलांना लग्नासाठी कुणी मुली द्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर पित्याला मुलींसाठी स्वत हून विचारणा करावी लागत आहे. शेतीला लागणाऱ्या मूलभूत सुविधा वीज, पाणी, मजूर, खते ,बियाणे, औषधे, मजूर , डिझेल यांच्या किमती काही वर्षांत गगनाला भिडल्या त्यात कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी बाजारपेठेत कोसळारे शेतीमालाचे भाव त्यामुळे शेती करणे हे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प जाहीर केला परंतु तो पूर्णत्वास नेता आलं नाही हे सर्वश्रुत असताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देशातील शेतकर्यांचे उत्पन्न दहा पटीने वाढल्याचा हास्यास्पद दावा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. यावरुन केंद्रीय कृषीमंत्री हे किती बेजबाबदार व संवेदनशील आहेत याचाच प्रत्यय येतो,शेतकऱ्यांचं उत्पन्न दहा पट तर सोडाच परंतु दुप्पट जरी झालं तरीही शेतकर्यांसारखा राजा कोणी असणार नाही सुंदर सुंदर व शिकलेल्या पोरीही मला नोकरीवाला नको शेतकर्यांशीच लग्न करायचे असं म्हटल्या असत्या परंतु सरकारच्या धोरणांमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याच्या ऐवजी खर्च वाढला परिणामी उत्पन्न कमी झालं त्याच्यामुळं हे अनेक प्रश्न निर्माण झाले याला केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी करून केंद्रात मंत्री असणार्या मोठ्या नेत्यांनी तरी अशाप्रकारचे हास्यास्पद दावे केले शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये अशी कडवट प्रतिक्रिया दिली .