ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तालुका स्तरीय आरोग्य मेळावा संपन्न -NNL


भोकर| 
आजादी का अमृत महोत्सव वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या सुचनेवरुन तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि. २२ एप्रिल रोजी  करण्यात आले होते. आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन  श्री अमित राठोड गट विकास अधिकारी पंचायत समिती भोकर यांनी केले. प्रमुख उपस्थिती डॉ हनमंत पाटील बाह्य रुग्ण संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ. संदेश जाधव जिल्हा आयुष अधिकारी नांदेड, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर व डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी केले.

आरोग्य मेळाव्यात ६०५ रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली. डिजिटल हेल्थ आयडी १६० तयार करण्यात आले, आयुष्मान भारत योजनेचे कार्ड ५० वाटप करण्यात आले. अवयव दान २७ नोंदणी , देहदान १३ नोंदणी, रक्तदान १०, टेलिकन्शलन १०२, नेत्ररोग तपासणी ७१, मोतीबिंदू शस्त्रक्रिया १० संदर्भ सेवा, उच्य रक्तदाब, ऱ्हदयरोग एन सी डी विभाग २५४ तपासणी, दंतरोग तपासणी १७, ७ एक्सट्रेक्ट, कान,नाक,घसा ३० तपासणी, रक्त तपासणी ५१, क्ष-किरण तपासणी १२, आयुर्वेद ४२, युनानी ४०, होमिओपॅथी ५० तपासणी शिबिरा मध्ये विविध तपासणी व निदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माधव विभुते स्रीरोग तज्ञ यांनी केले.


शिबीरा मध्ये विशेष तज्ञ म्हणून डॉ सारीका जेवळीकर, डॉ सागर रेड्डी बालरोग तज्ञ, डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ अस्मीता भालके भुलतज्ञ, डॉ नितीन कळसकर अस्थीरोग तज्ञ, डॉ संतोष अंगरवार सर्जन, डॉ संजय पोहरे कान नाक घसा तज्ञ, डॉ राजाराम कोळेकर दंत शल्यचिकित्सक तसेच गोदावरी हॉस्पिटल नांदेड विशेष तज्ञ यांनी सेवा दिली. जिवन आधार ब्लड बँक नांदेड येथील जगदीश सोनकांबळे, शेखर कांबळे, प्रणिता जाधव, नेहल सुरवसे यांनी रक्तदान शिबिर सेवा दिली. भोकर येथील नर्सिंग कॉलेज मधील आरोग्य सेविका यांनी सुध्दा सेवा दिली.

 यावेळी डॉ व्यंकटेश निलेवार वैद्यकीय अधिकारी मोघाळी, डॉ उमेश जाधव, डॉ जगदीश राठोड, डॉ प्रणिता राहटीकर, डॉ अर्चना गिरी, डॉ. विप्रमा पवार, डॉ शितल सोनटक्के, डॉ रजंना तोटेवाड, डॉ एकबाल, डॉ गजानन डाकोरे, डॉ तिरुपती गनुवाड, डॉ चिटकुलवार, डॉ गजानन कोलपवार समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ व्यंकटेश टाकळकर,डॉ अविनाश गुंडाळे, डॉ थोरवट, डॉ मुद्शीर, डॉ विजया किनीकर, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती संगेवार, डॉ जंगीलवाड,  सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, संतोष करपे नेत्रचिकित्सक, श्रीमती नवघडे,ब्राम्हणे,डवरे, माटोरे, शेंडगे, बोड्डेवाड, अधिपरीचारीका, बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सय्यद एम ऐ , दादाराव माचेवाड, आरोग्य सहाय्यक, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा लिपिक, गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे,संदिप ठाकूर, 

गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी,कु रोहीणी भटकर क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी,अतुल आडे, श्रीमती सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, मुक्ता गुट्टे , भालेराव, भिसे, सुवर्णकार आरोग्य सेविका, माया आडे डाटा ऑपरेटर, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र, डाकोरे वाहन चालक, बाबु मिया, शिंदे , नासेर, वडेलू, माटोरे,हत्तीरोग कर्मचारी व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य सहाय्यक, विठ्ठल मोरे, प्रदिप गोधणे आरोग्य कर्मचारी, गणेश गोदाम, राजु चव्हाण, पांडुरंग खोकले क्षेत्र कर्मचारी तसेच भोकर तालुक्यातील भोसी,किनी व मोघाळी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई, अंगणवाडी ताई, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ विजया किनीकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी