लोहा। नांदेड जिल्ह्यातच नसून राज्यभरात नावारूपाला आलेली व स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली व अनेक खासगी व जि.प.शाळानी वारंवार आदर्श घ्यावा अशी शाळा म्हणजे पारडी येथील जि.प.शाळेत दि.(२२) एप्रिल रोजी शुक्रवारी शाळा पुर्व तयारी पहिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिक्षण प्रेमी नागरिक,पालक, महिला ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होती.सदरिल मेळावा शाळेचे मुख्याध्यापक एम.एल किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे यांच्या हस्ते आद्य शिक्षिका तथा मुख्यिध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी.पं.स.च्या साधन व्यक्ती एम.एस.केदारे मैडम,व्हिएसटिएफ च्या गंगासागर दुधाटे, अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे, मुख्याध्यापक एम.एल.किसवे, सन्माननीय सदस्य,पालक वर्ग आदींच्या उपस्थितीत मेळावा अतिशय उत्साह पुर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी व्यासपीठावरून मुख्याध्यायापक एम एल किसवे यांनी पालकांना शाळा पुर्व तयारी चे प्रशिक्षण,गरज व नविन संकल्पना याविषयी आपले मत मांडले.शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यासंबंधी मुलांना अधिक ज्ञान कसे मिळवता येईल याविषयावर सखोल मार्गदर्शन ही केले.सहशिक्षकांनी शाळापुर्व तयारी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेने केलेली प्रगती व विविध उपक्रम राबवून शालेय मुलांच्या ज्ञानात अधिक भर टाकण्याचे कार्य अविरत पणे चालू असल्याचेव त्यासाठी शाळेतील सर्वच उपक्रमशिल शिक्षकांचे कार्य मोलाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
तत्पूर्वी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात हातात जनजागृती चे फलक घेऊन गावभर जनजागरण फेरी काढण्यात आली.त्यानंतर शाळेत येताच मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून पालक व विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.नुतन विद्यार्थ्याना औक्षण भरून बैंडपथकाच्या गजरात हळदी कुंकवाद्वारे पुजन करून ओल्या कुंकवात पाय बुडवून शाळेच्या वर्गात नव विद्यार्थ्यांच्या पाऊलाचे ठसे उमटलेले.तदनंतर शाळेच्या प्रांगणात विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनाचे सात ते आठ स्टॉल उभे करून त्या साहि त्याद्वारे प्रात्यक्षिके करून दाखवली.त्यात नाव नोंदणी व विकास पत्र देणे, शारिरीक विकास, बौद्धिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास,गननपुर्व तयारी यांसह प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली. खाऊचे वाटप करून मेळाव्याचा समारोप करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील डिकळे, उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्य, पालक वर्ग, ग्रामस्थांसह, लोहा पंचायत समितीच्या साधन व्यक्ती एम एस केदारे मॅडम, व्हिएस टिएफच्या गंगासागर दुधाटे, मारोतराव दुधाटे,पत्रकार शिवराज पाटील पवार,अतिशय शिस्तबद्धपणे सूक्ष्म नियोजन करणारे शाळेचे मुख्याध्यापक एम.एल.किसवे,पदवीधर शिक्षक बालाघाटे डी. पी.,कदम जे.ए., गंगाखेडकर सी.पी.,कदम आर.जी., देशमुख,इंगोले एस.एस.,यांच्या सह अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर सह ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट असे सुत्रसंचलन बालाघाटे डि.पी.यांनी तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक देशमुख यांनी मानले.