नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि.३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्र-संचालक डॉ. अर्जुन भोसले, उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, रामदास पेदेवाड, श्याम डाकोरे, सुधाकर शिंदे, प्रमोद हबर्डे, रामदास खोकले, दिपक हंबर्डे, संतोष हंबर्डे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.