मालेगाव| मागील दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
सकाळी दहा वा. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये विविध महापुरुषांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव ,भाजप नेते सुभाशिष कामेवार, सरपंच अनिल ईंगोले, उपसरपंच मनोहर खंदारे,ग्रा.सदस्य केशव हनुमंते यांची उपस्थिती होती.
शोभायात्रेच्या मार्गावर सामाजिक कार्यकर्त्यांनी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. जयंतीच्या नियोजनासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप दवणे,भिमा शितळे,विद्याधर तारू, मनोज शेळके, शशिकांत अटकोरे, स्वप्नील वाघमारे,स्वप्नील खंदारे राहुल अटकोरे, प्रशांत कुंटे, संतोष अटकोरे,राजु वालमारे, मिलींद वाहुळे,संतोष धुताडे, बबन मस्के, अतिष कांबळे, संजय कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
