आ. अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार -NNL

कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी


कोल्हापूर/मुंबई। 
राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी
त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केलातसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केलेत्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण होईलअशी भाषा वापरली आहेदुदैवाने त्यांच्या समोर आणि व्यासपिठावर बसलेले बहुतांश लोक हे हिंदूच होतेतरी त्यांच्या या जात्यंध विधानाला सर्वजण हसून प्रतिसाद देत होतेएकीकडे भोंग्यांच्या विषयावर मुसलमान समाजाच्या भावना दुखावतातम्हणून त्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल करत स्वतःच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवायच्यायातून अमोल मिटकरी यांना कोणत्या ‘वोट बँके’ची चिंता आहे आणि कोणत्या ‘वोट बँके’विषयी द्वेष आहेहे स्पष्ट दिसून येतेकन्यादान विधीचा मंत्र म्हणत जी टिंगल अमोल मिटकरींनी केलीतशी ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत मिटकरींमध्ये आहे का असा सवाल समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने श्रीसुनील घनवट यांनी केला आहे.

कोल्हापूर येथे गांधीनगर पोलीस ठाण्यात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात 21 एप्रिल या दिवशी  धर्मप्रेमी श्रीविक्रम चौगुले आणि श्रीअजित पाटील यांनी  तक्रार दाखल केली आहेया वेळी सर्वश्री राजू यादवविराग करीप्रकाश मुदुगडेअनिल दळवीश्रीकांत शिंदेअजित(अप्पापाटील,  माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास यमगरग्रामपंचायत सदस्य श्रीरमेश वाईंगडेहिंदु जनजागृती समितीचे श्रीशिवानंद स्वामी आणि बाबासाहेब श्रीभोपळे उपस्थित होतेकोणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावीहे आता सहन केले जाणार नाही

या विरोधात सनदशीर मार्गाने विरोध करत आंदोलन करण्यात येईलया कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री श्रीजयंत पाटील आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्रीधनंजय मुंडे यांनीही या जात्यंध आणि हिंदु धर्मविरोधी टिंगल करण्याला जोरजोरात हसत दाद दिलीराज्याचे सामाजिक न्याय मंत्रीच जर दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांना साथ देत असतीलतर राज्यात सामाजिक न्याय टिकून राहिल कायाबाबत शंका निर्माण होते

या घटनेनंतर राज्यभरातून टिका झाल्यावर जयंत पाटील यांनी ‘मी त्या विधानांविषयी दिलगिरी व्यक्त करतो’असे विधान केले आहेतसेच धनंजय मुंडे यांनी ‘अमोल मिटकरी जे बोलले ते वैयक्तिक बोललोकोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता’असे सांगून या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहेतर आमदार मिटकरी यांनी ‘वाचा मौनस्य श्रेष्ठम्’असे ट्विट केले आहे


वास्तविक अशा प्रकारची वरवरची क्षमायाचना अपेक्षित नसून असे प्रकार राजकीय पक्षातील लोकांकडून वारंवार का होतात याचा विचार करण्याची आवश्यक आहेत्याचप्रकारे स्वतकेलेल्या वक्तव्यावर क्षमा न मागता संस्कृत श्‍लोकांचा आधार घेऊन मिटकरी हे अद्याही क्षमा मागण्यास सिद्ध नाहीतअसेच म्हणावे लागेलतरी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमायाचना करावीअशी मागणी केली आहे.


    श्री. सुनील घनवट, समस्त हिंदुत्ववादी संघटना
 (संपर्क क्रमांक : 70203 83264)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी