नांदेड| शहरातील चैतन्यनगर शिवमंदिर येथे सामूहिक संकष्ट चतुर्थी व्रत उद्यापन कार्यक्रम दि. १९ एप्रिल २०२२ रोजी (अंगारकी योग) गोरज मुहूर्तावर चंद्र उदयाच्या साक्षीने सायंकाळी ६ ते ९.०५ या वेळेत स्थापित मंडळ देवता व होम हवनाने हा सोहळा संपन्न होत आहे.
दि. १९ एप्रिल रोजी श्री ष.ब्र. १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज महास्वामीजी बिचकुंदा (तेलंगणा) यांच्या पावन सानिध्यामध्ये सामूहिक संकष्ट चतुर्थी व्रत उद्यापन कार्यक्रमाचे चैतन्यनगर शिवमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोण्या भक्तांना चतुर्थी व्रत उद्यापन करावयाचे असेल तर त्यांनी एकनाथ महाराज, चैतन्यनगर शिवमंदिर पुजारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.