जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भोसीकर- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
लोहा| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात (ग्रामीण रुग्णालयात) आरोग्य महा मेळाव्याचे तसेच सर्व रोग निदान उपचार शिबीराचे आज सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक भूमिपुत्र डॉ नीळकंठ भोसीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान , महाराष्ट्र शासन यांच्या आदेशावरून लोहा शहरात ग्रामीण रुग्णालयात सोमवारी जिल्हा रुग्णालयात (ता १८) सकाळी नऊ ते सांयकाळी चार या वेळात हे शिबिर होणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, डॉ . हनुमंत पाटील ( बाहय संपर्क अधिकारी ) यांच्या उपस्थिती होणाऱ्या या आरोग्य मेळाव्यातब तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश गुंजलवार हे उपस्थित राहणार आहेत.
नांदेड जिल्हातील तज्ञ डॉक्टर हे रुग्ण तपासणी करणार आहेत आरोग्य महा मेळावा व सर्व रोग निदान शिबिरासाठी डॉ. कुलदीपक विनायक ( हृदयरोग तज्ञ ) डॉ . आवटी भास्कर ( सर्जन ) डॉ . प्रशांत जाधव ( बालरोग तज्ञ ) डॉ. एम. ए. रहेमान ( कान , नाक , घसा तज्ञ ) डॉ . गणेश चव्हाण ( स्त्रीरोग तज्ञ ) डॉ. पानझडे शितल ( भुल तज्ञ ) डॉ. हर्षदिप कांबळे ( ऑर्थोपेडिक सर्जन ) डॉ . रूबी सय्यद ( दंत शैल्य चिकित्सक ) बकार व किडणी विकार तज्ञ, मधुमेह तज्ञ, डोळयाचे सर्व विकार ( मोतीबिंदु ), अपेंडीक्स, हर्निया, थॉयराईड, अंडवृध्दी ऑपरेशन, महिलाचे सर्व आजार , व गरजुंचे ऑपरेशन अशी वेगवेगळ्या आजारांची तपासणी व उपचार या शिबिरात होणार तसेच अवयवदान व रक्तदान शिबीराचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यासाठी लोहा शहर व तालुक्यातील सर्व रुग्ण व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या या शिबिरास उपस्थित राहावे सोबत आधार कार्ड, राशन कार्ड व मतदान कार्ड आणावे.
पूर्वीच आजार असेल तर त्याची वैदयकीय कागदपत्रे सोबत आणावीत निदान झालेल्या आजारावर निदान व उपचार होणार आहेत. तसेच हेल्थ आयडी, गोल्ड कार्ड प्रधान मंत्री कार्ड देण्यात येणार आहेत . सर्व रोग निदान महामेळाव्यासाठी लोहा शहर व तालुक्यातील रुग्ण व नातेवाईक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा उप रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ. ए. एन. बारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश गुंजलवार, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने यांनी करण्यात आले आहे.