दहा वर्षापासुन बंद पडलेली पोलिस चौकी लोकसहभागामुळे नूतन ईमारतीत सुरु -NNL


हदगाव, शे.चांदपाशा| 
तालुक्यातील मनाठा पोलिस स्टेशन अतंर्गत येणाऱ्या मौजे बरडशेवाळा येथे पोलिस चौकी काही कारणास्तव गेल्या १० वर्षापासुन बंद अवस्थेत होती. त्यानंतर २०११-१२ च्या दरम्यान महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून हे पोलिस चौकीचे बांधकाकाम १० वर्षापुर्वी पुर्ण झाले होते. सदर पोलिस चौकीचे काम (इमारतपुर्ण होऊन) ही त्याचा उपयोग माञ काहीच होत नव्हता. या इमारतीकडे कुणाच ही लक्ष नसल्याने सदर पोलिस चौकीची इमारत ही वापरात नसल्याने अनेक वेळा दुरुस्ती केली गेली होती. 

अखेर या भागातील पञकार व गावक-यानी लोकसहभागातुन ईमारतीची दुरुस्ती व रंगरागोटी करुन या बाबतीत मनाठा पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरक्षक विनोद चव्हाण यांना कळविण्यात आले.   त्यांनी ही गावक-याच्या या सामाजिक उपक्रम मदत करणा-याचे आभिनंदन व कौतुक केले. या भागातील नागरिक व पोलिसांच 'समन्वय ' या पोलिस चौकीमुळे होणार आहे. विशेष म्हणजे मनाठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरक्षक विनोद चव्हाण यांनी या पोलिस चौकीच्या इमारतीच्या दुरुस्ती व रंगरागोटी करण्यासाठी सहभाग घेतलेल्या नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पञकारांचा खास सन्मान केला. विशेष म्हणजे शनिवारी सहाय्यक पोलिस निरक्षक यांच्या हस्ते या पोलिस चौकीचे छोटेखानी कार्यक्रमात गावक-या समावेत शानदार उद्घाटनही करण्यात आले.

पोलिस स्टेशन मनाठा...हदगाव तालुक्यात तामसा व मनाठा ही दोन पोलिस स्टेशन आहेत. मनाठा पोलिस स्टेशनला विनोद चव्हाण सहाय्यक पोलिस निरक्षक नावाचे रुजु झाले. ते कोणत्या ना कोणत्या सामाजिक उपक्रम कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमी या ग्रामीण भागतल्या नागरिकाशी सहज भेटत असतात. किरकोळ भानगडी तिथेच मिटवत आहेत. अणखीन विशेष म्हणजे मनाठा पोलिस स्टेशन   आवारात जिकडे तिकडे अस्वच्छता पोलिस स्टेशनची जिर्ण असलेली इमारत होती. आता या इमारतीची दुरुस्ती पोलिस स्टेशनचा परिसर मध्ये वृक्षरोपन स्वच्छता दिसुन येत आहे. पोलिस म्हटल्यावर सहसा नको वाटते पण मनाठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरक्षक माञ नागरिकांशी 'समन्वय ' हे सामाजिक दृष्टीने ठेवतात हे फारच महत्त्वाचे असल्याचे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी