आ.माधवराव पा.जवळगावकरांनी केल मराठी नववर्षाच पारंपरिक पद्धतीने स्वागत -NNL

यंदाचे नववर्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरभराटी घेऊन येणारे ठरो आणि सर्वाना दीर्घायुष्य लाभो 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आ.माधवराव पा.जवळगावकर यांनी आपले मूळ गाव जवळगाव येथील शेतात तास करून सर्जा राजाच्या संग मराठी नववर्ष तथा गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरी केला. तसेच यंदाचे नववर्ष शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरभराटी घेऊन येणारे ठरो आणि सर्वाना दीर्घायुष्य लाभो अशी कामना करून त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.


दि.०२ एप्रिल रोजीच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या यंदाचा गुढीपाढवा कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणारा ठरला असून, सर्वाना मोकळा श्वास घेता येत आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र मराठी नववर्ष आनंदाच्या वातावरणात आणि उत्साहात साजरा केला जात असून, आज सकाळी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील निवासास्थानी गुढी उभारली. आणि शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने काळ्या आईची आणि सर्जा - राजाची पूजा - अर्चना करून तास करत नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर शेती कामांना सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले कि, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे सावट होते, त्या महामारीच्या कचाट्यातून आजपासून सर्वांची सुटका झाली आहे. शासनाने सर्व निर्बंध उठविले असले तरी आपल्यासह कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मास्क लावणे गरजेचे आहे. 


अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेप्रमाणे माझा शेतकरी बांधव गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर शेतीकामांना प्रारंभ करतात. तर घराघरात आनंदाची व विजयाची गुढी उभारली जाते. यंदाचा हा सण सर्वांसाठी आनंद द्विगुणित करणारा आहे. गुढीपाडवा निमित्ताने माझ्या सर्व शेतकरी बांधवाना यंदाचे नववर्ष सुख समृद्धी व उत्पन्नात भरभराटी देणारा ठरो. माता लक्ष्मीची कृपादृष्टी होऊन आर्थिक संकटातून मुक्ती मिळो अशी कामना करत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील तमाम शेतकरी व महिला - पुरुष जनतेला मराठी नववर्ष गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी