हिमायतनगर, अनिल मादसवार| भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपने सरकार चालवत आहे. देशाच्या सुरक्षेसह हिंदू संस्कृती कायम ठेवण्याच्या दृष्टीने पाऊले उचली आहे. त्यामुळे घराघरात भाजपचे कार्य पोचले असून, याचा जोरावर भारतीय जनता पार्टी आगामी येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, सह सर्वच निवडणुकीत सर्व ताकदीनिशी खंबीर होऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन मराठवाडा संघटनमंत्री श्री संजयजी कौडगे यांनी केले.
मराठवाडा संघटनमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री संजयजी कौडगे हिमायतनगर तालुका दौऱ्यावर आले. त्यांनी तालुका अध्यक्ष अशिष सकवान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपच्या शहर व तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले कि, भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुकीत भाजप सर्व ताकदीनिशी उतरणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पणाने चालवत असून, या सरकारच्या काळामध्ये गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी लोकांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष म्हणून विधानसभा दिसून येईल. भाजपाची सत्ता महाराष्ट्रात येणार हि काळा दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपा मध्ये राहून पार्टी विरुद्ध गद्दारी करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी ते म्हणाले.
या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान, सुधाकर पाटील, खंडु चव्हाण, रामभाऊ सूर्यवंशी, सुभाष माने, महेश अंबिलगे, राहुल देवसरकर, ज्ञानेश्वर पदलंवाड, सचिन कोमावार, भीमराव आडे, नितीन मुधोळकर, परमेश्वर सूर्यवंशी, राम जाधव, बालाजी ढोणे, आनंद घोसलवाड, माधव कदम, दत्ता घोसरवाड, सुरज चिंतावार, किरण चव्हाण, प्रशांत ढोले, निलेश चटणे, अनिल गोरेकर, यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

