नांदेड| केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क कार्यालय नांदेड मंडळातर्फे नांदेड, हिंगोली आणि लातूर या तीन जिल्ह्यातील जीएसटी कर ते कर सल्लागार यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. ही कार्यशाळा शुक्रवार 25 मार्च 2022 रोजी सायं 4 वा. होटल सिटी प्राइड, एमजीएम कॉलेज रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व जीएसटी करदाता व कर सल्लागार यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तु व सेवाकर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त एल.वी. कुमार यांनी केले आहे.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वस्तु व सेवाकर तथा उत्पादन शुल्क औरंगाबादचे आयुक्त मनोज कुमार रजक हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत करदात्यांना जीएसटी कार्यप्रणाली मध्ये राहून कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जीएसटी कार्यप्रणालीमध्ये अपडेटस यावर मार्गदर्शन कार्यशाळा सीजीएसटी तर्फे घेण्यात येत आहे.
या कार्यशाळेत सीजीएसटी औरंगाबाद अधिक्षक दिपक गुप्ता हे जीएसटी मध्ये 1 जानेवारी 2022 पासून अंमलात येणारे बदलावर व तसेच केंद्रीय बजेट 2022 च्या जीएसटीमध्ये येणाऱ्या काळात होणारे अपेक्षित बदला-बदल सखोल पॉवर पॉइंट प्रोजेक्टवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी उद्योजक, करदाते व कर सल्लागार यांच्या शंकेचे निरासरन करण्यात येईल. या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, आणि लातूर जिल्ह्यातील जीएसटी करदाता आणि कर सल्लागार यांची मोठी उपस्थिती असेल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.