दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला रस्ते नको अगोदर गटारीच्या पाणी बंद करा आम्हाला पिण्यासाठी शुद्ध जल द्या असे त्राही त्राही करणारी जुण्या नांदेड च्या नागरिकांचे म्हणणे. भारतीय जनता पार्टीचे अमोल श्रीराम कुल्थिया यांनी आज महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांच्याजवळ जुन्या नांदेड शहरामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी गटारीचं घाण पाणी महानगरपालिकेच्या नळात येत आहे या बद्दल निवेदन केले.
फक्त रस्ते रुंद करून किंवा रस्त्यावर रस्ते बनवून शहराचा किंवा प्रभागाचा विकास होत नसतो त्याच्यासाठी त्याच्या मूलभूत सवलतींचा सुद्धा लक्ष द्यावा लागतो आजही नांदेडच्या विकासाचे मोठमोठे व्याख्यान देणाऱ्या नांदेडचे मोठमोठे नेते नगरसेवक हे कधीच सांगणार नाही की आजही नांदेडच्या भागातल्या गटारीच्या व नळाच्या पाइपलाइनची व्यवस्था पूर्ण नाही आजही डॅमेज असलेल्या ड्रेनेज लाईन नळाचे पाईपलाईन मुळे बऱ्याच नागरिकांच्या घरात गटारीचा पाणी नळाच्या माध्यमातून येतो.
जेणेकरून हजारो नागरिकांचे जीव धोक्यात पडतात इतक्या वर्षापासून या त्रासाचं निराकरण नांदेड महानगरपालिका ला करता आलेलं नाही आणि कोणत्याही नगरसेवकाचा किंवा नांदेडच्या मोठ्या नेत्याचा या जवळ लक्ष नाही नांदेड ला मोठ्या रस्त्यांचे काम आणून नाव मिरवणारे नेते हे कधी विचार करतील या रस्त्याखाली लोकांच्या जीवनासाठी दडलेले एक लाईफ लाईन आहे त्याची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही.
तोपर्यंत नागरिकांना चांगलं पाणी पिण्यासाठी भेटणं शक्य नाही एका बाजूला दोन दोन दिवस तीन तीन दिवसाआड पाणी येतो आणि तो पण पुर्णतः दूषित पाणी लोकांना रस्ते नंतर हवे आहेत पण अगोदर पिण्याच्या पाण्याची सोय हवी आहे. जोपर्यंत ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या लाईन ची दुरुस्ती होत नाही व जनतेला चांगलं पिण्यासाठी पाणी भेटत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी तर्फे देण्यात आला आहे. निवेदन देताना अमोल कुलथिया यांच्यासह सागर जोशी व भानुदास लोलगे हेही उपस्थित होते.