नांदेड| आज प्रत्येक क्षेत्रांत महिला अग्रेसर असून, आरोग्य विभागात त्या सक्षमपणे सामाजिक भावनेतून कर्तव्यतत्पर आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कोविद काळातही महिलांनी जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणारी त्या सर्व महिलांना शुभेच्छा.
कोविड - १९ चा धोका टाळण्यासाठी शासन निर्देशानुसार जनजागृती व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सोबतच,विविध राष्ट्रीय उपक्रमांत तसेच,वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्या सामाजिक बांधिलकी समजून कर्तव्य बजावत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याही कार्याची नोंद घेणे निश्चितच महत्त्वाचे ठरते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याउद्देशाने टिपलेले आजचे छायाचित्र.
नांदेड तालुक्यातील प्रा.आ.केंद्र वडगांव अंतर्गत प्रा.आ.उपकेंद्र कामठा (खु.) येथे आज कोविड प्रतिबंधक लसीकरण करतांना कंत्राटी आरोग्य सेविका श्रीमती एस.यु.शेगांवकर.समवेत,सि. एच.ओ.डॉ.फराह तन्वीर,आरोग्य पर्यवेक्षक टि.एल.डोईबळे,अंगणवाडी स्वयंसेवीका श्रीमती अनिता गोवंदे व आशा स्वयंसेवीका श्रीमती अर्जूमन सय्यद मुसा अली आदी.