विद्यापीठ कायदा रद्द कारावा म्हणून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अभाविपच्या ११ मार्च रोजी टाळनाद आंदोलन -NNL


नांदेड|
दिनांक २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विद्यापीठ कायद्यातील काही बिल पास करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ज्य शासनाने हा विद्यापीठ कायदा रद्द कारावा म्हणून शुक्रवारी,दिनांक ११ मार्च २०२२ रोजी दु.१२ वाजून ३० मिनिटांनी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी टाळनाद आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी अभाविपच्या देवगिरी प्रदेश मंत्री अंकिता पवार या उपस्थित राहणार असून नांदेड बरोबरच हिंगोली,किनवट,परभणी, लातूर व उदगीर या ठिकाणाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

 विधीमंडळाच्या या अधिवेशनात ह्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले असून शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाहीत. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच मा. राज्यपाल यांना करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर  प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष , नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल. सन्मा. कुलपती ( राज्यपाल ) हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत , त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल.

म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शुक्रवारी,दिनांक ११ मार्च २०२२ रोजी दु.१२ वाजून ३० मिनिटांनी महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात टाळनाद आंदोलन करणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी