नांदेड| आमचं गाव आमचा विकास पंचवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी गनस्तरीय कार्यशाळा कासराळी येथे संपन्न झाली. सदरील कार्यशाळेचे उद्घाटन जि. प सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच, स्थानिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले योगदान देऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन ठक्करवाड यांनी केले.सदरील कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी म्हणून सरपंच शेषेराव लंके हे होते. आमचं गाव आमचा विकास या बद्दल प्रशिक्षक म्हणून सी .एन. मोरे यांनी माहिती दिली तर या कार्यशाळेबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या विविध विभागातील योजना व उपक्रमांची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील पारडे यांनी दिली.
या कार्यशाळेस सरपंच प्रतिनिधी हणमंतराव पाटील, भोसीचे उपसरपंच मंगणाळे, कासराळी चे उपसरपंच बसवंत पाटील, माधव डोम्पले, शिवा पाटील, चिंचोली, रुद्रापूर, सावळी येथील सरपंच, ग्रा.वी. आ. दिलीप कीनवाड, शिवाजी शिंदे ,संदीप मोरे, पशुधन विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी रश्मी मॅडम, ग्रामसेवक ,अंगणवाडी सेविका यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.