महावितरण अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणा व नपच्या दुर्लक्षामुळे हिमायतनगरात पाण्यासाठी भटकंती -NNL

वॉर्ड क्रमांक १ मधील डीपी महिन्याभरापासून नादुरुस्त असल्याने पाणी टंचाई वाढली 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील नगरपंचायत अंतर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. गेल्या महिन्याभरा पासून येथील डीपी नादुरुस्त असताना महावितरण विभागाच्या लाईनमन व कनिष्ठ अभियंत्याचा नाकर्तेपणा आणि नपच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांनी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. यासाठी वॉर्डातील नागरिकांनी महावितरणला निवेदन देऊनही महावितरणचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. तात्काळ येथील डीपी दुरुस्त करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यतः महावितरण आणि नपच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात १७ वॉर्ड आहेत, मागील ५ वर्षात नगरपंचायतीने केलेल्या विकासाचे छत्र शहरातील जनता याची देही याची डोळा पहाटे आहे.आत्तापर्यंत हिमायतनगर शहरातील कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटविण्यात नगरपंचायत प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे आजही शहरातील अनेक वॉर्डातील नागरिकांना कधी नगरपंचायत प्रश्नाच्या हलगर्जीपणा तर काही महावितरण अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणाचा फटका सहन करावा लागतो आहे. अशीच समस्या शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील शंकर नगर, बजरंग चौक, नाका गल्लीतील नागरिकांना भेडसावत आहे. 

पळसपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या कामटे चौकात डीपी गेल्या महीन्याभरापासून नादुरुस्त आहे. वीजपुरवठा बरोबर होत नसल्याने सार्वजनिक विहिरीतुन नागरिकांना होणारा पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी अत्यंत महत्वपूर्व व जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी महिला, अबाल वृद्ध व नागरिकांना दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी दिवसरातर भटकंती करावी लागते आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नागरपंचायतीसह महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी विनंती निवेदन देऊन केली होती. तसेच वारंवार पाठपुरावा केला मात्र शहराच्या कारभार पिणाऱ्या लाईनमन व कनिष्ठ अभियंत्यांकडून टोलवा टोलवी करून नवीन डीपी बसविण्यास टाळाटाळ चालविली जात आहे.


तसेच नगरपंचायतीचे संबंधितांनी दखल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हि बाब लक्षात घेता नगरपंचायतीने पुढाकार घेऊन तातडीने येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरण कंपनीला सोबत घेऊन येथील नादुरुस्त डीपी काढून तातडीने नवीन डीपी बसवावा. अन या भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी रास्ता अपेक्षा येथील महैला, पुरुष नागरिकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा महावितरण आणि नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा येथील जागरूक नागरिकांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे. 

या संदर्भात महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियानात श्री नागेश लोणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, नागरिकांनी डीपी बदलून देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यानुसार मी येणे भागडी डीपी देखील कनिष्ठ अभियंता पवन भडंगे यांचेकडे दिला आहे. त्यांनी अद्याप डीपी का..? बसविला नाही, यःची मला माहिती नाही. तरी याबाबत मी विचारपूस करून लवकरात लवकर शंकर नगर येथील डीपी लवकरात लवकर बसवून नागरिकांची अडचण सोडविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.  

प्रशासकांसह गुढग्याला बाशिंग बांधलेल्या भावींचेही दुर्लक्ष-हिमायतनगर नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून तब्बल दीड वर्ष होत आहेत, त्यामुळे नगरपंचायतीचा प्रशासक पाहत असून, प्रशकाची येथील अधिकारी - कर्मचाऱ्यावर वाचक नसल्याने शहरातील नागरी समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचे सर्वश्रुत आहे. एवढेच नाहीतर आगामी निवडणुकीत उभे राहणाए गुडघ्याला बाशिंग बांधून नेहमी पुढे पुढे करणारे भावी नगरसेवकांची संख्या वाढली आहे. मात्र वॉर्डातील समस्यांसाठी पुढे येऊन सोडविण्यासाठी कोणीच धडपडत नसल्याने आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदान करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल असेही काहींनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी