अर्धापूर| तालुक्यातील पार्डी म .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत गणवेश वाटप करण्यात आले आहे .
जिल्हा परिषद मार्फत अनु .जाती ,अनु -जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो यावर्षी पात्र लाभार्थ्यांमध्ये १४१ मुलांचा समावेश झाला होता. परंतु शाळेची पटसंख्या २०२ असल्याने उर्वरित ५२ मुलांना शासनाकडून गणवेश मिळाला नाही. मात्र शाळेतील शिक्षकांकडून राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले असून, अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १०० टक्के मोफत गणवेश वाटप केल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले आहे .
मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले आहे. यावेळी पार्डी म सरपंच संघटनेचे नीळकंठराव मदने, पत्रकार युनूस नदाफ , नागेश देबगुंडे, शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख , योगाजी कल्याणकर, नामदेव भोसले,शोभा देशमुख , मंगला सलामे ,उषा नळगिरे आदी उपस्थित होते.