उमरी ते शिर्डी पदयात्रा नांदेड मार्गे औरंगाबाद कडे रावना : साई भक्तांकडून पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत -NNL


नांदेड।
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डीत दाखल होणारी उमरी ते शिर्डी पदयात्रा रविवारी नांदेड मार्गे औरंगाबाद कडे रवाना झाली असून साई भक्तांकडून  शहरात ठिक ठिकाणी पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले. 

गेल्या अकरा वर्षापासून ही पदयात्रा अविरतपणे सुरू आहे. संतकवी दासगणू महाराज यांनी शिर्डी येथील साई बाबांच्या समाधीस्थळाचे जवळपास ३५ वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या नावाने ही निघणारी पदयात्रा मानाची पालखी म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रातील ही मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाते. रामनवमीला या पालखीचे आगमन शिर्डी नगरीत होणार असून साईबाबा संस्थानच्या वतीने देखील या पालखीचे स्वागत करण्याची परंपरा आहे. 


यंदा शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेशराव वाबळे पाटील यांच्यासह साईबाबा संस्थानचे विश्वस्त व पदाधिकारी या पालखीचे स्वागत करणार आहेत. या पदयात्रेत मुख्य प्रवर्तक विष्णू अट्टल, अध्यक्ष गोपाळ राठोर, कार्याध्यक्ष अशोक मामीडवार, प्रवीण सारडा, संभाजी सावंत, , सुभाष गोरठेकर, केलास गोरठेकर,राम येरावार,महेश नगनुरवार, बाळू महाराज काचावार,उध्दव मामडे सदानंद खांडरे यांच्यासह जवळपास ३०० भाविक सहभागी झालेले आहेत. 


उमरी ते शिर्डी पदयात्रा नांदेड येथे पोहचल्यानंतर शिवाजीनगर येथिल हनुमान मंदिर परिसरात "साई बाबांच्या" पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले.  साई भक्त दिलिप कंदकुर्ते,नानक साई चे प्रमूख पंढरीनाथ बोकारे, मानवाधिकार समितीचे अध्यक्ष नामदेव कुंभार (पेठवडगाव),चचंद्रशेखर पाटील (गडहिंग्लज),डॉ गजानन देवकर, बिपीन गादेवार, डॉ शरद चरखा, नागनाथ गडम,सुरेश कुलकर्णी,स्वप्निल गुंडावार, दिगम्बर लाभशेटवार, राहुल अमिलकंठवार, गजानन श्रीरामवार,, धनंजय उमरीकर, जयप्रकाश नागला, प्रल्हाद भालेराव, बबलू यादव, रितेश व्यवहारे, नगरेश्वर वैश्य मंदिर धार्मिक समिती प्रमूख गणेश गादेवार, अरुण चालीकवर, श्रीकांत वटमवार,महेश मुखेडकर हे स्वागताला उपस्थित होते.. चांदोजी पावडे मंगल कार्यालयात यात्रा काल रात्री मुक्कामी होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी