नविन नांदेड। महाशिवरात्रीचे औचित्य साधून नांदेड येथील सेव्हन हिल्स रूग्नांलयाचा वतीने ६ मार्च जिल्हा परिषद शाळा राहेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात १५० जेष्ठ नागरिक,महिला युवक यांच्यी तपासणी करण्यात आली होती व मोफत औषधोपचार देण्यात आले.
नांदेड येथील सेव्हन हिल्स रूग्नांलयाचा वतीने महाशिवरात्री निमित्ताने राहेगाव येथे या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तज्ञ डॉ .चांदु पाटील, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ .सुप्रिया गोडघासे, डॉ.चंदन धोगंडे, यांनी शिबीरात सहभागी झालेल्या १५० रूगनांची विवीध आजारांवर तपासणी केली आहे.
या शिबिरात सहभागी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून मोफत औषधोपचार देण्यात आले आहेत.या शिबीरात सहभागी वैद्यकीय तज्ञ डॉक्टर यांच्ये ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वीतेसाठी योगेश काकडे, अर्जुन पाटील राहेगावकर आनंदराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुजलवार, लाईन मेन बालाजी कदम, साहेबराव इंगळे, ज्ञानेश्वर भोंग, गोविंदा भोंग गजानन भोंग, मारुती भोंग, यांच्या सह ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.