नरेगा विभागात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त -NNL


नांदेड|
जिल्हाधिकारी कार्यालयातील नरेगा विभागास तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून बी.पी. घाडगे यांची निवड झाली आहे. 1 ऑगस्ट पासून ते रुजू झाले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण प्राधिकारी तथा स्वायत व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना कक्षात तक्रार पेटी ठेवण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेसंदर्भात अथवा मनरेगा संदर्भात जर कुणाच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी आता जिल्हाधिकारी कार्यालयात उपरोक्त प्राधिकारी यांच्याकडे नोंदविता येतील असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी कळविले आहे.

सर्व सामान्य नागरिकांना या योजनेतर्गत काम करणारे, मजूर या योजनेचे लाभार्थी तसेच क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अंमलबजावणी यंत्रणाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी या व्यवस्थेची माहिती दर्शविणारे फलक अथवा पोस्टर्स/फ्लेक्स सर्व पंचायत समिती, तहसिल कार्यालय, सर्व अंमलबजावणी यंत्रणाची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय/मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, 

उपवनसंरक्षण वन विभाग/विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय/जिल्हा रेशीम विभाग, सर्व ग्रामपंचायत स्तरावर व इतर संबंधित कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो कक्षात तक्रार पेटी ही ठेवण्यात आली आहे. ज्याना तक्रार सादर करयची आहे त्यांनी बाळासाहेब घाडगे, तक्रार निवारण प्राधिकारी (नरेगा), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड (रोहयो विभाग), मोबाईल क्रमांक 9405806999/9423135100, ई-मेल- ghadgepatil222@gmail.com  वर संपर्क साधावा असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी