टाकळगाव येथे स्मशानभूमी शेड बांधकामाचा शुभारंभ-NNL


नांदेड।
लोहा तालुक्यातील टाकळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना - जनसुविधे अंतर्गत सार्वजनिक स्मशानभूमि शेड बांधकामाचा शुभारंभ पंचायत समिती लोहाचे सभापती मा.आनंदराव पाटील शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

टाकळगाव येथे अनेक वर्षापासुन स्मशानभूमि शेड बांधकाम करण्याची जनतेची मागणी होती, सरपंच भिमराव लामदाडे  यांनी सतत पाठपुरावा करून, जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे व सभापती आनंदराव पाटील शिंदे यांनी या मागणीची गरज लक्षात घेऊन ,स्मशानभूमि शेड बांधकाम मंजूर केले.

या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच भिमराव लामदाडे, माजी सरपंच काशिनाथराव लामदाडे,माजी उपसरपंच श्रीहारी लामदाडे,महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव मोरे,पोलिस पाटील पंढरी थेटे,उपसरपंच संभाजी चिंतोरे, चेअरमन पांडुरंग खानसोळे,बालाजीराव मोरे,दत्तराम मोरे, लक्ष्मण लामदाडे,डिंगाबर लामदाडे,व्यंकटराव खानसोळे,आनंदा आंबटवाड,बालाजी पांचाळ,रुद्राजी लामदाडे,नागोराव चिंतोरे,दत्ता देवकांबळे,कडाजी लामदाडे, बळीराम लामदाडे, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी