धर्माबाद/नांदेड| आपल्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा राग- मनात धरून संख्या मुलानेच बापाला मारहाण करून यमसदनी पाठविले आणि हा प्रकार उघड होऊन नये म्हणून प्रेत रेल्वे पटरीवर टाकून दिल्याची घटना दि.२२ मार्च रोजी उघडकीस आली असून, या बाबत मयताच्या बाहिनेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वडिलासमान असलेल्या सासरे आणि सुनेच्या नात्याला काळिमा फासल्या गेल्याची चर्चा धर्माबाद परिसरात होते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शंकर विठ्ठल बोगुलवार वय ५४ वर्ष यांच्यासह मुलगा सून धर्माबाद - तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या मौजे तोंडाला, मंडळ तानूर या गावात राहतात. दरम्यान काही दिवसापूर्वी शंकर विठ्ठल बोगुलवार याने आपल्या सुनेसोबत गैरवर्तन केले. हा प्रकार तिने पती विठ्ठल शंकर बोगुलवार यास सांगितली. पत्नीसोबत बापाने केलेल्या कृत्याच्या राग मनात धरून संख्या मुलानेच बापला यमसदनी धाडले. आणि आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत अतकुर गावाजवळ रेल्वे पटरीवर आणून टाकून दिले.
आपल्या भावाचा खून झाल्याचे समजल्यानंतर मयताची बहीण चंद्रकलाबाई भुमन्ना गड्डम जि तेलंगणा राज्यातील वर्णी, बोधन, जी. निझामाबाद येथे राहते. तिने याबाबतची तक्रार धर्माबाद पोलीसांत दिल्यावरून बापाच्या खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२२ अनुसार कलम ३०२, २०१, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरील खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विजय पंतोजी मो.क्रमांक ९४२१७६१२७४ हे करीत आहेत.