उत्तम कानिंदे आणि रमेश मुनेश्वर यांनी संपादित केलेल्या 'शब्दक्रांती ' -NNL

प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला अक्षरोदयचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर 


किनवट , माधव सूर्यवंशी|
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या क्रांतीसूर्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या उत्तम कानिंदे आणि रमेश मुनेश्वर या उपक्रमशिल शिक्षकांनी संपादित केलेल्या 'शब्दक्रांती' प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्रचा राज्यस्तरीय 'अक्षरोदय साहित्य गौरव पुरस्कार ' जाहीर झाला आहे. 

सदरील पुरस्कार वितरण रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी पिपल्स काॅलेज नांदेड येथे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिका मंगलाताई फुलारी, ग्रामीण कथाकार दिगंबर कदम, जेष्ठ रंगकर्मी डॉ.विजयकुमार माहुरे उपस्थित राहणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष मारोती मुंडे तसेच संयोजक सदानंद सपकाळे यांनी कळविले आहे.

क्रांतीसुर्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पहिल्यावहिल्या साहित्यकृतीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, गझलकार मधु बावलकर, प्रा. डॉ. पंजाब शेरे, सांगावाकर महेंद्र नरवाडे,  एडवोकेट मिलिंद सर्पे, पत्रकार गोकुळ भवरे, प्रा. गजानन सोनोने, प्राचार्य सुरेश पाटील, मिलिंद जाधव, रुपेश मुनेश्वर, भारतध्वज सरपे, सुमेध घुगरे, राजेश पाटील, मारोती काळबांडे, शेषेराव पाटील, राजा तामगाडगे, मिलिंद कंधारे, रामस्वरूप मडावी,  आदीनी अभिनंदन केले आहे


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी