या कार्यक्रमाला उपस्थित केशवराव परभणकर, दत्तराम पाटिल करंजीकर, बालाजी मानकरी, माधवराव सुर्यवंशी, रऊफ खान पठाण, डॉ. प्रताप परभणकर, अहमद हुसेन पठाण, शिवाजी पवार, नामदेव जाधव, संजय चाभरेकर, ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, प्रकाश सोळंके, डॉ. रामदास परभणकर, डॉ. प्रताप परभणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रताप परभणकर या प्रसंगी बोलतांना म्हणाले; नविन पिढीला सेवा पुर्ती नंतरच्या वेळेचा उपयोग झाला पाहिजे, शिक्षण महत्त्वाचे असुन शेती त्या सोबतच्या व्यवसायासाठी , तरूणांनी वेळ असाच खर्ची न घालवता त्याचा सद्उपयोग केला पाहिजे, नितीने कामे करून, बदलत्या परस्थिती नुसार बदलल पाहिजे, सर्व कार्यक्रम उपक्रमांचा गावाला फायदा झाला पाहिजे या हेतुने आयोजन कराव, तरूणांत उद्योगशीलता वाढली पाहिजे, कृषी उत्पादन, शेतीवर आधारीत , होतकरू तरूण पुढे येवुन कृषी क्षेत्रातील अभ्यासाच ज्ञान निवृतित अधिकार्यां कडुन घेतल पिहिजे, अगोदरच्या आताच्या तरूण पिढीत समजुन घेणे वापरात येत असलेल्या नविन साधनांमुळे कीहीशी दरी निर्माण झाली आहे, यामुळे दोन पिढीतला संवाद राहिला नाही, परस्थिती नुसार जुन्या नविन बाबीची तडजोड करून नियोजनबध्द प्रगती करण्याचा सल्ला त्यानी नवीन पिढीला दिला. वयोवृध्द लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत, त्यांना तरूणांची मदत पाहिजे असते, तरूणांनी पुढे यायला पाहिजे, असही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देतांना महाराष्ट्र राज्य महामंडळ कृषी उद्योग नांदेड जिल्हा व्यवस्थापक रंगराव जाधव म्हणाले; शिक्षणामुळे सामान्य कुटूंबातुन समोर आलो आहे, ४७ वर्षा पुर्वी चौथी पर्यंतच शिक्षण पुर्ण करून करंजी गाव सोडल त्या नंतरच शिक्षण उमरीत हॉस्टेलला राहुन घेतल, दरम्यान गावातील काहींना शिक्षणासाठी उमरीला नेल बरेजन नौकरीवर आहेत, काही वैद्यकीय अधिकारी झालेत, मी १० वी नंतर शिकाऊ उमेदवार म्हणुन कामाला लागलो, जिल्हा न्यायालय व जिल्हा परीषदेतील नौकरी सोडली, डिप्लोमा केला, एम.ए. नंतर लेबर लॉ पर्यंतच शिक्षण पुर्ण केल,
शिक्षण वाया जात नाही शिकत रहा, शिक्षण घेतल पाहिजे, सुरूवाती पासुन समाज सेवेच , संघटनांमध्ये काम केल, सेवेत असतांना कुणाच्याही नव्या पैशाची अपेक्षा केली नाही, ४ हजार कर्मचाऱ्यांत एकमेव असा अधिकारी आहे, एकाच ठिकाणी कारकुन ते प्रथम श्रेणी दर्जाची ३७ वर्ष निष्कलंक सेवा झाली, नौकरीन बरच काही दिल अस सांगायला ते विसरले नाही, जीवनात
अनेक स्थित्यंतर येवुन गेली परंतु गावाची नाळ सोडली नाही. सेवेत मानसान कस जगाव वागाव, हे शिकत मानस जोडत गेलो त्याच हे फलीत असल्याच ते म्हणाले. गावातील तरूण वयोवृध्द मंडळींनी समोर येवुन कार्यक्रमाच आयोजन केल, हा कार्यक्रम चांगला पायंडा आहे. याही पुढे जावुन गावासाठी हातभार लावुन पुढे नेण्याचा प्रयत्न करू असही ते बोलले.
यावेळी डॉ. भुजंग जाधव, विनायक सुर्यवंशी, बापुराव जाधव, अमोल जाधव, राज गाडेकर, शाम सुर्यवंशी, चंद्रकांत कदम, बाबुराव माने, सुदर्शन जाधव, अशोक जाधव, देविदास जाधव, निरंजन जाधव, गोविंद करंजीकर, माधव धोंडगे, श्रीनिवास सुर्यवंशी, गजानन शिंदे, मनोज शिंदे, पोलिस पाटील बापुराव मिराशे, पांडुरंग सुर्यवंशी, सुदर्शन जाधव, बालाजी सुर्यवंशी, राज मुगुळकर, गणेश जाधव, आत्माराम जाधव, गणेश जाधव यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचालन संजय चाभरेकर यांनी केल.