नविन नांदेड| सिडको नागरी हक्क विकास परिषद वाघाळा शहर नविन नांदेड चा वतीने सिडको कार्यालया समोर विविध मागण्यासाठी साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला होता,मागण्याची दखल घेत सिडको नांदेड प्रशासक यांनी आठ दिवसांत मुंबई मुख्यालय येथे प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे साखळी उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.
सिडको प्रशासनाने २००४ -५ मध्ये १०० टक्के विलंब आकार व्याज माफी योजना राबविली होती ती पुन्हा राबविण्यात यावी, सिडको हडको घरावरील १०० टक्के व्याज माफी देऊन मुळ मालकांच्या अनुपस्थित घरे हस्तांतरित करण्यात यावे,घरधारकांनी पुर्ण पैसे भरलेले आहेत सिडको प्रशासकाच्या सहीने नावाची यादी जाहीर प्रगटन दिलेल्या घरघारकाचे घरे हस्तांतरित करून द्यावे या मागणीसाठी सिडको नागरी हक्क विकास परिषद यांच्या वतीने दि.२१ मार्च पासून सिडको कार्यालय समोर साखळी उपोषणास सुरुवात केली.
अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनटक्के, उपाध्यक्ष भिमराव बेरजे, सरचिटणीस अशोक मगरे, कोषाध्यक्ष मल्लिकार्जुन पदरगे,सह सचिव पि.एम.कोकरे, सल्लागार भिमराव जमदाडे, तुकाराम हनुमंते टि.एन.वडगावकर,बि.डी.कांबळे, गुलाब रसुल साहब,गिरीधर मैड,आंनदा सोमावाड, गणेशराव भरकड, शेषेराव ढेबंरे, भगवान बारसे यांच्या सह पदाधिकारी बसले होते. या साखळी उपोषण सिडको प्रशासक यांनी मागण्या संदर्भात आठ दिवसांत सिडको मुख्यालय मुंबई येथे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ मार्च रोजी हे साखळी उपोषण सिडको प्रशासक भुंजगराव गायकवाड यांनी लेखी पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून दिल्या नंतर मागे घेण्यात आले.